११ तेव्हा तुम्ही पर्वताच्या पायथ्याजवळ येऊन उभे राहिलात. तो पर्वत जळत होता आणि ती आग आकाशापर्यंत पोहोचली होती. सगळीकडे काळोख, ढग आणि गडद अंधार होता.+ १२ मग यहोवा त्या आगीतून तुमच्याशी बोलू लागला.+ तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला, पण तुम्हाला कोणताही आकार दिसला नाही,+ फक्त आवाज येत होता.+