-
गणना १६:३९, ४०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३९ मग अग्नीने भस्म झालेल्या लोकांनी जी तांब्याची धूप-पात्रं आणली होती, ती एलाजार याजकाने घेतली आणि वेदीला मढवण्यासाठी ठोकून त्यांचे पत्रे बनवले. ४० यहोवाने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच त्याने केलं. अधिकार नसलेल्या* आणि अहरोनच्या संततीपैकी नसलेल्या कोणीही धूप जाळण्यासाठी यहोवापुढे येऊ नये;+ तसंच, कोणीही कोरह आणि त्याच्या साथीदारांसारखं बनू नये,+ याची इस्राएली लोकांना आठवण राहावी, म्हणून हे करण्यात आलं.
-
-
१ शमुवेल २:२७, २८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२७ एकदा देवाचा एक माणूस एलीकडे आला आणि म्हणाला: “यहोवा म्हणतो: ‘तुझा पूर्वज आणि त्याचं घराणं इजिप्तमध्ये* फारोच्या घराण्याची गुलामी करत होतं, तेव्हा मी तुझ्या पूर्वजासमोर प्रकट झालो नव्हतो का?+ २८ मी इस्राएलच्या सर्व वंशांमधून त्याला याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी निवडलं होतं.+ माझ्या वेदीवर बलिदानं अर्पण करण्यासाठी,+ धूप जाळण्यासाठी* आणि एफोद घालून माझ्यासमोर सेवा करण्यासाठी मी त्याला निवडलं होतं. इस्राएली लोकांनी अग्नीत जाळून केलेल्या सर्व अर्पणांतला हिस्सा घेण्याचा हक्क मी तुझ्या पूर्वजाच्या घराण्याला दिला होता.+
-