५ जर आता तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकलं आणि माझ्या कराराचं पालन केलं, तर तुम्ही सर्व राष्ट्रांमधून माझी खास प्रजा* व्हाल,+ कारण सबंध पृथ्वी माझ्या मालकीची आहे.+
६ कारण तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या नजरेत एक पवित्र राष्ट्र आहात आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला स्वतःचे लोक, म्हणजेच आपली खास प्रजा* होण्यासाठी, पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या इतर सर्व राष्ट्रांमधून निवडलं आहे.+