-
निर्गम १४:२५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ तो त्यांच्या रथांची चाकं काढू लागला आणि त्यांना रथ चालवणं कठीण होऊ लागलं. तेव्हा इजिप्तचे लोक म्हणू लागले: “चला, आपण इस्राएली लोकांपासून पळून जाऊ, कारण यहोवा त्यांच्या बाजूने आपल्याशी लढतोय!”+
-
-
१ शमुवेल ४:८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ आता आपलं काय होईल? या शक्तिशाली देवाच्या हातून आपल्याला कोण वाचवेल? ज्याने ओसाड रानात इजिप्तच्या लोकांवर वेगवेगळ्या पीडा आणून त्यांना मारून टाकलं होतं तो हाच देव आहे.+
-
-
एज्रा १:२, ३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ “पर्शियाचा राजा कोरेश म्हणतो, ‘स्वर्गाचा देव यहोवा याने पृथ्वीवरची सगळी राज्यं माझ्या हातात दिली आहेत+ आणि त्याने मला यहूदा इथल्या यरुशलेममध्ये त्याच्यासाठी एक मंदिर* बांधण्याची आज्ञा दिली आहे.+ ३ म्हणून, त्याच्या लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल, त्याचा देव त्याच्यासोबत असो. त्याने यहूदा इथल्या यरुशलेमला जावं आणि इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर पुन्हा बांधावं. तोच खरा देव आहे आणि त्याचं मंदिर यरुशलेममध्ये होतं.*
-