४३ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. आणि तो विदेशी जी काही विनंती करेल ती तू पूर्ण कर. म्हणजे तुझ्या इस्राएली लोकांप्रमाणेच पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना तुझं नाव समजेल आणि ते तुझं भय बाळगतील.+ तसंच, मी बांधलेल्या या मंदिराला तुझं नाव दिलेलं आहे हेसुद्धा त्यांना समजेल.