३९ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. त्यांना क्षमा करून+ मदत कर. आणि प्रत्येकाला आपल्या कामांप्रमाणे प्रतिफळ दे;+ कारण तू प्रत्येकाचं मन ओळखू शकतोस (तूच फक्त प्रत्येक माणसाचं मन खऱ्या अर्थाने ओळखू शकतोस).+
९ आणि माझ्या मुला शलमोन, तू आपल्या वडिलांच्या देवाला जाणून घे आणि पूर्ण हृदयाने*+ व आनंदी मनाने* त्याची सेवा कर. कारण यहोवा सगळ्यांची मनं पारखतो+ आणि मनातले सगळे विचार व हेतू त्याला कळतात.+ तू त्याला शोधलंस तर तो तुला सापडेल.+ पण जर तू त्याला सोडून दिलंस, तर तो तुझ्याकडे कायमची पाठ फिरवेल.+