-
१ शमुवेल २०:१९-२२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ आणि तिसऱ्या दिवशी तर ते नक्कीच तुझ्याबद्दल विचारतील. तू त्या दिवशी* लपला होतास, तसा पुन्हा या ठिकाणी ये आणि या दगडाजवळ थांबून राहा. २० मग, निशाण्यावर बाण मारत असल्यासारखं दाखवून मी दगडाच्या एका बाजूला तीन बाण सोडीन. २१ आणि मी माझ्या सेवकाला बाण शोधून आणायला पाठवीन. जर मी त्याला म्हणालो: ‘बघ! बाण तुझ्या या बाजूला आहेत. ते घेऊन ये,’ तर तू परत येऊ शकतोस. कारण जिवंत देव यहोवाची शपथ, त्याचा अर्थ असा असेल की सर्वकाही ठीक आहे आणि तुला कोणताही धोका नाही. २२ पण, जर मी सेवकाला म्हणालो: ‘बघ, बाण तुझ्या पलीकडे आहेत,’ तर तू निघून जा. कारण यहोवा तुला पाठवतोय.
-