-
लेवीय २४:७-९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ प्रत्येक थप्पीवर शुद्ध ऊद* ठेव. तो ऊद भाकरींच्या अर्पणाचं प्रतीक*+ असेल. तो अग्नीत जाळून यहोवाला अर्पण केला जाईल. ८ त्याने प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी, यहोवासमोर नियमितपणे भाकरी रचून ठेवाव्यात.+ हा इस्राएली लोकांसोबत माझा कायमचा करार आहे. ९ त्या भाकरी अहरोनसाठी आणि त्याच्या मुलांसाठी असतील.+ त्यांनी त्या एका पवित्र ठिकाणी खाव्यात,+ कारण कायमच्या नियमाप्रमाणे, यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांतला, हा याजकासाठी असलेला परमपवित्र भाग आहे.”
-
-
मार्क २:२५, २६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ पण येशू त्यांना म्हणाला: “एकदा दावीदला आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नव्हतं तेव्हा त्याने काय केलं, हे तुम्ही कधी वाचलं नाही का?+ २६ दावीद देवाच्या घरात गेला आणि त्याने पवित्र भाकरी* खाल्ल्या आणि आपल्या माणसांनाही दिल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या खाणं योग्य नव्हतं.+ तुम्ही याबद्दल मुख्य याजक अब्याथार+ याच्या वृत्तान्तात वाचलं नाही का?”
-
-
लूक ६:३, ४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ पण येशूने त्यांना उत्तर दिलं: “जेव्हा दावीद आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती, तेव्हा त्याने काय केलं हे तुम्ही कधी वाचलं नाही का?+ ४ दावीद देवाच्या घरात गेला आणि त्याला देण्यात आलेल्या पवित्र भाकरी* त्याने खाल्ल्या आणि आपल्या माणसांनाही दिल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या खाणं योग्य नव्हतं. तुम्ही याबद्दल कधी वाचलं नाही का?”+
-