-
लेवीय २६:२९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२९ तुम्हाला आपल्या मुलामुलींचं मांस खावं लागेल.+
-
-
अनुवाद २८:५३-५७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५३ तेव्हा तुम्हाला तुमचा देव यहोवा याने दिलेल्या तुमच्या पोटच्या मुलामुलींचं* मांस खावं लागेल.+ कारण तुमच्या शत्रूंनी तुमच्या शहरांना घातलेला वेढा खूप कडक असेल आणि ते तुमच्यावर अत्याचार करतील.
५४ तुमच्यातला सर्वात प्रेमळ आणि हळव्या मनाचा माणूसही आपल्या भावाला, आपल्या प्रिय बायकोला किंवा आपल्या उरलेल्या मुलांना दया दाखवणार नाही. ५५ तो खात असलेलं आपल्या मुलांचं मांस त्यांना देणार नाही, कारण शत्रूंनी शहरांना घातलेला वेढा खूप कडक असल्यामुळे आणि त्यांच्या अत्याचारामुळे, त्याच्याकडे खाण्यासाठी दुसरं काही उरणार नाही.+ ५६ आणि नाजूक असल्यामुळे जमिनीवर पायही न ठेवणारी, तुमच्यातली सर्वात कोमल आणि हळव्या मनाची स्त्रीसुद्धा+ आपल्या प्रिय नवऱ्याला, मुलाला किंवा मुलीला दया दाखवणार नाही. ५७ आपल्या पोटातून निघणाऱ्या मुलांवर, तसंच प्रसूतीनंतर तिच्या गर्भातून जे काही बाहेर पडतं त्यावरही ती दया दाखवणार नाही. कारण शत्रूंनी शहरांना घातलेला वेढा खूप कडक असल्यामुळे आणि त्यांच्या अत्याचारामुळे, ती ते सर्व लपूनछपून खाईल.
-