-
१ इतिहास २९:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ या सर्व गोष्टी स्वेच्छेने दान करण्यात लोकांना खूप आनंद झाला. कारण त्यांनी ते पूर्ण मनाने यहोवाला दिलं होतं;+ आणि दावीद राजालाही अतिशय आनंद झाला.
-
-
एज्रा ७:१४-१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ कारण तुझ्याकडे* असलेलं तुझ्या देवाचं नियमशास्त्र, यहूदामध्ये आणि यरुशलेममध्ये पाळलं जात आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी राजा आणि त्याचे सात सल्लागार तुला तिथे पाठवत आहेत. १५ तसंच, यरुशलेममध्ये राहणाऱ्या इस्राएलच्या देवासाठी, राजाने आणि त्याच्या सल्लागारांनी स्वेच्छेने दिलेलं सोनंचांदी तिथे नेण्यासाठी; १६ शिवाय, बाबेलच्या संपूर्ण प्रांतातून तुला जे सोनंचांदी मिळेल,* त्यासोबतच लोक आणि याजक यरुशलेममधल्या आपल्या देवाच्या मंदिरासाठी स्वेच्छेने ज्या भेटी देतील,+ त्या सर्व तिथे नेण्यासाठी तुला पाठवलं जात आहे.
-