-
२ राजे २४:११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ सैन्याने शहराला वेढा घातलेला असताना, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरही तिथे आला.
-
-
२ इतिहास ३६:७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ शिवाय, नबुखद्नेस्सरने यहोवाच्या मंदिरातली काही भांडीही बाबेलला नेली आणि ती आपल्या राजमहालात ठेवली.+
-
-
२ इतिहास ३६:१८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ त्याने खऱ्या देवाच्या मंदिरातली छोटी-मोठी अशी सगळी भांडी; तसंच, यहोवाच्या मंदिरातला आणि राजाचा व अधिकाऱ्यांचा सगळा खजिना बाबेलला नेला.+
-
-
दानीएल १:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१ यहूदाचा राजा यहोयाकीम+ याच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी, बाबेलचा* राजा नबुखद्नेस्सर याने यरुशलेममध्ये येऊन त्या शहराला वेढा घातला.+ २ काही काळानंतर, यहोवाने* यहूदाचा राजा यहोयाकीम याला त्याच्या हाती दिलं.+ याशिवाय, खऱ्या देवाच्या मंदिरातली काही भांडीही देवाने त्याला नेऊ दिली. तो ती भांडी शिनार*+ देशात त्याच्या देवाच्या मंदिरात घेऊन गेला. आणि त्याने ती भांडी त्याच्या देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.+
-
-
दानीएल ५:२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ मग नशेत असताना बेलशस्सरने असा हुकूम दिला, की त्याचे वडील नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेममधल्या मंदिरातून जी सोन्या-चांदीची भांडी आणली होती ती घेऊन यावीत;+ म्हणजे राजा आणि त्याचे प्रतिष्ठित लोक, तसंच त्याच्या उपपत्नी आणि त्याच्या दुसऱ्या बायका हे सगळे त्यांतून द्राक्षारस पितील.
-