-
यिर्मया ३३:१०, ११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० “यहोवा म्हणतो: ‘तुम्ही म्हणाल, की ही जागा ओसाड झाली आहे. इथे एकही माणूस किंवा प्राणी नाही. यहूदातली शहरं आणि यरुशलेममधले रस्ते सामसूम पडले आहेत; तिथे ना माणूस राहतो ना प्राणी. पण तिथे पुन्हा एकदा ११ आनंदोत्सवाचा आवाज आणि वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज ऐकू येईल.+ तसंच, तिथे असं म्हणणाऱ्यांचाही आवाज ऐकू येईल: “सैन्यांचा देव यहोवा याचे आभार माना! कारण यहोवा चांगला आहे.+ त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम टिकून राहतं!”’+
यहोवा म्हणतो, ‘मी या देशातल्या बंदिवानांना परत घेऊन येईन आणि त्यांची स्थिती आधीसारखीच चांगली करीन. तेव्हा ते यहोवाच्या मंदिरात उपकारस्तुतीची अर्पणं घेऊन येतील.’”+
-