-
निर्गम २०:८-११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ शब्बाथाचा दिवस पाळायला विसरू नका आणि तो पवित्र माना.+ ९ सहा दिवस कष्ट करून तुमची सगळी कामं करा,+ १० पण सातवा दिवस हा तुमचा देव यहोवा याच्यासाठी शब्बाथाचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही किंवा तुमच्या मुलाने, मुलीने, दासाने, दासीने, तुमच्या गुराढोरांनी, तसंच तुमच्या वस्त्यांमध्ये* राहणाऱ्या विदेश्यानेसुद्धा कोणतंही काम करू नये.+ ११ कारण यहोवाने सहा दिवसांत आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातलं सर्वकाही निर्माण केलं आणि सातव्या दिवशी तो विश्रांती घेऊ लागला.+ म्हणूनच यहोवाने शब्बाथाच्या दिवसाला आशीर्वाद देऊन त्याला पवित्र ठरवलं आहे.
-
-
अनुवाद ५:१२-१४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, शब्बाथाचा दिवस पाळा आणि तो पवित्र माना.+ १३ सहा दिवस कष्ट करून तुमची सगळी कामं करा,+ १४ पण सातवा दिवस हा तुमचा देव यहोवा याच्यासाठी शब्बाथाचा दिवस आहे.+ त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करू नये.+ तसंच तुमच्या मुलाने, मुलीने, दासाने, दासीने, बैलाने, गाढवाने, तुमच्या कोणत्याही पाळीव प्राण्याने, तसंच तुमच्या शहरांमध्ये* राहणाऱ्या विदेश्यानेसुद्धा कोणतंही काम करू नये;+ म्हणजे तुमच्या दासाला आणि दासीलाही तुमच्यासारखीच विश्रांती घेता येईल.+
-