-
अनुवाद ८:७-९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ कारण तुमचा देव यहोवा तुम्हाला एका चांगल्या देशात नेत आहे.+ त्या देशाच्या दऱ्याखोऱ्यांतून आणि डोंगरांतून पाण्याचे ओढे, नाले आणि झरे* वाहतात. ८ तिथे जव आणि गहू उगवतात. तिथे द्राक्षवेली, तसंच अंजिरांची+ आणि डाळिंबांची झाडं आहेत. तो जैतुनाच्या तेलाचा आणि मधाचा देश आहे.+ ९ त्या देशात तुम्हाला कधीही अन्न कमी पडणार नाही आणि कशाचीही कमतरता भासणार नाही; तिथल्या खडकांमध्ये लोखंड आहे आणि तिथल्या डोंगरांतून तुम्ही तांबं खणून काढाल.
-