२० त्यांच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे,+ मी जेव्हा त्यांना दूध आणि मध वाहत असलेल्या देशात+ घेऊन जाईन, आणि ते खाऊन तृप्त होतील आणि त्यांची भरभराट होईल,*+ तेव्हा ते इतर देवांकडे वळतील आणि त्यांची उपासना करू लागतील. ते माझा अनादर करतील आणि माझा करार मोडतील.+
१२ ज्या देवाने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं होतं त्या त्यांच्या पूर्वजांच्या देवाला, यहोवाला त्यांनी सोडून दिलं.+ ते त्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या दैवतांमागे लागले+ आणि त्यांच्या पाया पडू लागले. असं करून त्यांनी यहोवाचा क्रोध भडकवला.+