४३ त्याने कित्येकदा त्यांना सोडवलं,+
पण ते पुन्हा बंड करून त्याच्या आज्ञा मोडायचे+
आणि त्यांच्या अपराधामुळे त्यांची दुर्दशा व्हायची.+
४४ पण मग तो त्यांच्यावर आलेलं संकट पाहायचा+
आणि मदतीसाठी केलेला त्यांचा आक्रोश ऐकायचा.+
४५ त्यांच्यासाठी तो आपला करार आठवायचा
आणि त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे त्याला त्यांची दया यायची.+