१२ तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन हा आपले सेवक, अधिकारी, दरबारी आणि आपली आई या सगळ्यांना घेऊन+ बाबेलच्या राजाला शरण गेला;+ बाबेलच्या राजाने आपल्या शासनकाळाच्या आठव्या वर्षी यहोयाखीनला बंदी बनवून नेलं.+
१४ नबुखद्नेस्सरने यरुशलेममधल्या सगळ्यांना, म्हणजे सर्व अधिकारी,*+ शूर योद्धे आणि सर्व कारागीर व लोहार* यांना बंदी बनवून नेलं;+ अशा एकूण १०,००० जणांना त्याने बंदी बनवून नेलं. देशात फक्त गरीब व कंगाल लोक उरले.+