-
यिर्मया ३४:१८-२०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ तसंच, ज्या लोकांनी वासराचे दोन तुकडे केले आणि त्या तुकड्यांमधून चालत जाऊन माझ्यासमोर करार केला;+ पण त्या करारातल्या अटी पाळल्या नाहीत आणि माझ्यासोबत केलेला करार मोडला, त्यांच्या बाबतीत १९ म्हणजे, यहूदाचे अधिकारी, यरुशलेममधले अधिकारी, राजदरबारी, याजक आणि देशातले सगळे लोक जे वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत गेले, त्या सगळ्यांच्या बाबतीत हे घडेल: २० मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हाती देईन. त्यांची प्रेतं आकाशातल्या पक्ष्यांसाठी आणि जमिनीवरच्या प्राण्यांसाठी अन्न होईल.+
-