-
निर्गम ९:२३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाच्या दिशेने उगारली आणि यहोवाने ढगांचा गडगडाट करून गारांचा पाऊस पाडला आणि जमिनीवर आग* पडू लागली. यहोवाने इजिप्तच्या संपूर्ण देशात गारांचा पाऊस पाडला.
-
-
१ शमुवेल १२:१७, १८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ सध्या गव्हाच्या कापणीचा काळ चालू आहे ना? पण बघा, मी यहोवाला अशी विनंती करतो, की त्याने ढगांचा गडगडाट करावा आणि पाऊस पाडावा. मग तुम्हाला कळून येईल, की आपल्यासाठी राजाची मागणी करून तुम्ही यहोवाच्या नजरेत किती वाईट काम केलंय.”+
१८ मग शमुवेलने यहोवाला प्रार्थना केली. आणि त्या दिवशी यहोवाने ढगांचा मोठा गडगडाट करून पाऊस पाडला. त्यामुळे सगळ्या लोकांना यहोवाची आणि शमुवेलची मोठी दहशत बसली.
-