१५ हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील?
तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहू शकतं?+
२ असा मनुष्य, जो निर्दोषपणे चालतो,+
योग्य ते करतो+
आणि मनातसुद्धा खरं बोलतो.+
३ तो आपल्या जिभेने बदनामी करत नाही,+
आपल्या शेजाऱ्याचं वाईट करत नाही,+
आणि आपल्या मित्रांची निंदा करत नाही.+
४ तो वाईट कामं करणाऱ्यांना तुच्छ लेखतो,+
पण यहोवाचं भय मानणाऱ्यांचा आदर करतो.
नुकसान सहन करावं लागलं, तरी तो दिलेला शब्द मोडत नाही.+
५ तो व्याजाने पैसे उसने देत नाही+
आणि निर्दोष माणसाविरुद्ध लाच घेत नाही.+
जो कोणी या गोष्टी करतो, तो कधीच डळमळणार नाही.+