१६ तिसऱ्या दिवशी सकाळी, ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. पर्वतावर एक दाट ढग दिसला+ आणि शिंगाचा खूप मोठा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा छावणीतले सगळे लोक थरथर कापू लागले.+
१८ संपूर्ण सीनाय पर्वतातून धूर निघत होता, कारण यहोवा आगीतून पर्वतावर उतरला होता.+ भट्टीतून निघावा तसा धूर वर आकाशाकडे जात होता आणि संपूर्ण पर्वताला भयंकर हादरे बसत होते.+