३ यहोवा सीयोनचं सांत्वन करेल.+
तो तिच्या सगळ्या उद्ध्वस्त ठिकाणांचं सांत्वन करेल,+
तो तिचं ओसाड रान एदेनसारखं,+
आणि तिचा वाळवंटी प्रदेश यहोवाच्या बागेसारखा करेल.+
तिच्यामध्ये आनंदोत्सव आणि जल्लोष होईल.
उपकारस्तुतीचा आणि मधुर गीतांचा आवाज तिच्यामध्ये ऐकू येईल.+