७ तुम्ही ज्या देशात जाऊन त्याचा ताबा घेण्याच्या बेतात आहात, त्या देशात जेव्हा यहोवा तुम्हाला नेईल,+ तेव्हा तो या मोठमोठ्या राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल:+ हित्ती, गिर्गाशी, अमोरी,+ कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी.+ ही सात राष्ट्रं तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली आहेत.+