१३ मूर्ख स्त्री मोठमोठ्याने बोलते.+
तिला कसलंही ज्ञान नसतं; कशाचीच माहिती नसते.
१४ ती शहरातल्या उंच ठिकाणी,
आपल्या घराच्या दाराजवळ बसते.+
१५ ती येणाऱ्या-जाणाऱ्यांना;
आपल्या रस्त्याने सरळ जाणाऱ्यांना हाक मारून म्हणते:
१६ “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.”
ज्यांना समज नाही त्यांना ती म्हणते:+
१७ “चोरलेलं पाणी गोड लागतं
आणि चोरून खाण्यातच खरी मजा आहे.”+
१८ पण त्यांना माहीत नसतं, की तिचं घर म्हणजे मृतांचं घर;
आणि तिच्या घरी जाणारे कबरेच्या खोल ठिकाणांत जातात.+