यशया ४४:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ हे आकाशांनो, आनंदाने जयघोष करा! कारण यहोवाने पाऊल उचललंय. हे पृथ्वी, आनंदाने जयजयकार कर! डोंगरांनो, जंगलांनो आणि तुमच्यातल्या सगळ्या झाडांनो, तुम्हीसुद्धा आनंद साजरा करा!+ कारण यहोवाने याकोबला सोडवलंय,आणि इस्राएलवर आपलं वैभव प्रकट केलंय.”+ यशया ६१:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ सीयोनसाठी शोक करणाऱ्यांना राखेऐवजी सुंदर पगडी देण्यासाठी,शोकाऐवजी आनंदोत्सवाचं तेल,आणि निराश मनाऐवजी स्तुतीचं वस्त्र देण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे. त्यांना नीतिमत्त्वाचे मोठे वृक्ष म्हटलं जाईल;यहोवाच्या नावाचा गौरव व्हावा म्हणून त्याने लावलेली झाडं, असं त्यांना म्हटलं जाईल.+ यिर्मया ३१:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ “त्या वेळी कुमारी आनंदाने नाचू लागेल,आणि तरुण व वृद्ध माणसंसुद्धा एकत्र नाचतील.+ मी त्यांचा शोक आनंदात बदलून टाकीन.+ मी त्यांचं सांत्वन करीन, आणि त्यांच्या दुःखाच्या बदल्यात त्यांना आनंद देईन.+
२३ हे आकाशांनो, आनंदाने जयघोष करा! कारण यहोवाने पाऊल उचललंय. हे पृथ्वी, आनंदाने जयजयकार कर! डोंगरांनो, जंगलांनो आणि तुमच्यातल्या सगळ्या झाडांनो, तुम्हीसुद्धा आनंद साजरा करा!+ कारण यहोवाने याकोबला सोडवलंय,आणि इस्राएलवर आपलं वैभव प्रकट केलंय.”+
३ सीयोनसाठी शोक करणाऱ्यांना राखेऐवजी सुंदर पगडी देण्यासाठी,शोकाऐवजी आनंदोत्सवाचं तेल,आणि निराश मनाऐवजी स्तुतीचं वस्त्र देण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे. त्यांना नीतिमत्त्वाचे मोठे वृक्ष म्हटलं जाईल;यहोवाच्या नावाचा गौरव व्हावा म्हणून त्याने लावलेली झाडं, असं त्यांना म्हटलं जाईल.+
१३ “त्या वेळी कुमारी आनंदाने नाचू लागेल,आणि तरुण व वृद्ध माणसंसुद्धा एकत्र नाचतील.+ मी त्यांचा शोक आनंदात बदलून टाकीन.+ मी त्यांचं सांत्वन करीन, आणि त्यांच्या दुःखाच्या बदल्यात त्यांना आनंद देईन.+