३ म्हणून, त्याच्या लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल, त्याचा देव त्याच्यासोबत असो. त्याने यहूदा इथल्या यरुशलेमला जावं आणि इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर पुन्हा बांधावं. तोच खरा देव आहे आणि त्याचं मंदिर यरुशलेममध्ये होतं.*
१२ तो राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून झेंडा उभारेल आणि इस्राएलच्या विखुरलेल्या लोकांना गोळा करेल.+ तो पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांतून यहूदाच्या पांगलेल्या लोकांना एकत्र करेल.+