१५ इस्राएलचा देव यहोवा मला म्हणाला: “माझ्या हातातला हा द्राक्षारसाचा प्याला, हा क्रोधाचा प्याला घे. आणि ज्या राष्ट्रांकडे मी तुला पाठवीन, त्या सर्वांना तो प्यायला लाव. १६ तो प्याला पिऊन ते झोकांड्या खातील आणि वेड्यांसारखं वागतील; कारण मी त्यांच्यामध्ये तलवार पाठवतोय.”+