-
अनुवाद ३०:१-३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३० मी तुम्हाला सांगितलेले हे सर्व शब्द, म्हणजे तुमच्यासमोर ठेवलेले सर्व आशीर्वाद आणि शाप जेव्हा तुमच्या बाबतीत खरे ठरतील;+ आणि तुमचा देव यहोवा ज्या राष्ट्रांमध्ये तुमची पांगापांग करेल,+ त्या सर्व राष्ट्रांमध्ये तुम्हाला या शब्दांची आठवण होईल;*+ २ आणि जेव्हा तुम्ही तुमचा देव यहोवा याच्याकडे परत याल+ आणि मी आज तुम्हाला देत असलेल्या आज्ञांप्रमाणे, तुम्ही व तुमची मुलं पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने* त्याचं ऐकाल,+ ३ तेव्हा तुमचा देव यहोवा तुम्हाला दया दाखवेल+ आणि बंदिवासातून परत आणेल.+ आणि ज्या राष्ट्रांमध्ये तुमचा देव यहोवा याने तुमची पांगापांग केली होती, त्यांतून तो तुम्हाला पुन्हा गोळा करेल.+
-
-
यशया ६६:२०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२० जसं इस्राएली लोक शुद्ध भांड्यात आपली भेट घेऊन यहोवाच्या मंदिरात येतात, तसं ते सर्व राष्ट्रांमधून तुमच्या सगळ्या भाऊबंदांना यहोवासाठी भेट म्हणून घेऊन येतील;+ ते त्यांना घोड्यांवर, चपळ उंटांवर, खेचरांवर आणि रथांमध्ये व गाड्यांमध्ये बसवून माझ्या पवित्र डोंगराकडे, यरुशलेमकडे घेऊन येतील,” असं यहोवा म्हणतो.
-
-
यहेज्केल ३६:२४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ मी तुम्हाला राष्ट्रांमधून, सगळ्या देशांमधून गोळा करून परत तुमच्या देशात आणीन.+
-