१७ हे माझ्या देवा, मला हे चांगलं माहीत आहे, की तू मन ओळखणारा आहेस+ आणि तुला एकनिष्ठता प्रिय आहे.+ मी या सर्व गोष्टी तुला प्रामाणिक मनाने आणि स्वेच्छेने दिल्या आहेत. आणि इथे असलेले तुझे लोकसुद्धा तुला स्वखुशीने दान देत आहेत, हे पाहून मला खूप आनंद होतोय.