११ हे ऐकून दावीदने दुःखाने आपले कपडे फाडले आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या माणसांनीही तसंच केलं. १२ त्यांनी शौल, त्याचा मुलगा योनाथान, यहोवाचे लोक आणि इस्राएलचं घराणं+ या सर्वांसाठी संध्याकाळपर्यंत मोठमोठ्याने रडून शोक आणि उपास केला.+ कारण ते सर्व तलवारीने मारले गेले होते.