-
नहेम्या ९:१७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ त्यांनी तुझं ऐकलं नाही+ आणि तू त्यांच्यासमोर केलेली अद्भुत कार्यं ते विसरून गेले; ते हट्टी बनले* आणि आपल्यासाठी एक पुढारी नेमून ते इजिप्तच्या गुलामगिरीत परत जायला निघाले.+ पण, तू क्षमाशील, करुणामय,* दयाळू व सहनशील* देव आहेस आणि एकनिष्ठ प्रेमाने* भरलेला आहेस,+ म्हणून तू आमच्या वाडवडिलांना सोडलं नाहीस.+
-
-
मीखा ७:१८, १९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ तुझ्यासारखा देव कोण आहे?
तू अपराधांची क्षमा करतोस आणि तुझ्या वारशाच्या लोकांमधून जे उरलेले आहेत,+ त्यांच्या पापांची तू आठवण ठेवत नाहीस.+
तुझा क्रोध सर्वकाळ राहणार नाही,
कारण तुला एकनिष्ठ प्रेमाची आवड आहे.+
१९ तू आम्हाला पुन्हा दया दाखवशील;+ तू आमचे अपराध पायाखाली तुडवशील.*
तू आमची सर्व पापं खोल समुद्रात टाकून देशील.+
-