४४ त्या राजांच्या दिवसांत, स्वर्गाचा देव एक असं राज्य स्थापन करेल+ ज्याचा कधीही नाश होणार नाही.+ ते राज्य दुसऱ्या कोणाच्याही हाती जाणार नाही.+ तर ते या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा नाश करेल,+ आणि फक्त तेच कायम टिकेल.+
१५ सातव्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला,+ तेव्हा स्वर्गात मोठ्या घोषणा ऐकू आल्या: “जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं+ आणि त्याच्या ख्रिस्ताचं झालं+ आहे, आणि तो सदासर्वकाळ राजा म्हणून राज्य करेल.”+