२२ माझ्या पित्याने सगळ्या गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत आणि मुलगा कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाही माहीत नाही. तसंच, पिता कोण आहे हे मुलाशिवाय,+ आणि ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.”+
२० आपल्याला माहीत आहे, की देवाचा मुलगा आला आहे+ आणि जो खरा आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून त्याने आपल्याला बुद्धी* दिली आहे. आणि जो खरा आहे त्याच्यासोबत, त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपण ऐक्यात आहोत.+ हाच खरा देव आणि सर्वकाळाचं जीवन आहे.+