वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क १४:३-९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ मग, येशू बेथानी इथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवत होता, तेव्हा एक स्त्री शुद्ध जटामांसीच्या* सुगंधी तेलाची बाटली घेऊन त्याच्याजवळ आली. ते तेल खूप मौल्यवान होतं. तिने बाटली* उघडली* आणि ती त्याच्या डोक्यावर तेल ओतू लागली.+ ४ हे पाहून काही लोक संतापले आणि एकमेकांना म्हणाले: “ही बाई सुगंधी तेल वाया का घालवत आहे? ५ हेच तेल विकलं असतं तर ३०० दिनारांपेक्षा* जास्त पैसे मिळाले असते आणि ते गरिबांना देता आले असते!” ते तिच्यावर खूप चिडले.* ६ पण येशू त्यांना म्हणाला: “तिला रागावू नका. तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलंय.+ ७ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील+ आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.+ ८ तिला जे करता आलं ते तिने केलं. तिने माझ्या दफनविधीच्या तयारीसाठी आधीच माझ्या शरीराला सुगंधी तेल लावलंय.+ ९ मी तुम्हाला खरं सांगतो, जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाईल,+ तिथे तिथे या स्त्रीची आठवण करून, तिने जे काही केलं तेही सांगितलं जाईल.”+

  • योहान १२:१-८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ वल्हांडणाच्या सहा दिवसांआधी येशू बेथानी इथे आला. त्याने ज्याला मेलेल्यांतून उठवलं होतं तो लाजर+ इथेच राहायचा. २ त्यांनी येशूसाठी संध्याकाळच्या जेवणाची मेजवानी ठेवली होती आणि मार्था त्यांना वाढत होती.+ तसंच, येशूसोबत बसून जेवणाऱ्‍यांमध्ये लाजरही होता. ३ मग मरीयाने सुमारे ३०० ग्रॅम* शुद्ध जटामांसीचं* खूप मौल्यवान असं सुगंधी तेल घेऊन, येशूच्या पायांवर ओतलं आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. सुगंधी तेलाचा सुवास संपूर्ण घरात दरवळू लागला.+ ४ पण त्याच्या शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत,+ जो लवकरच त्याला विश्‍वासघाताने पकडून देणार होता, तो म्हणाला: ५ “हे सुगंधी तेल ३०० दिनारांना* विकून ते पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत?” ६ पण तो हे गरिबांची काळजी असल्यामुळे बोलला नाही. खरंतर तो चोर होता आणि त्याच्याजवळ ठेवलेल्या पैशांच्या डब्यातून तो पैसे चोरायचा. ७ तेव्हा येशू म्हणाला: “तिला रागावू नका. माझ्या दफनविधीच्या तयारीसाठी तिला हा विधी करू द्या.+ ८ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील,+ पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा