-
मार्क १४:१७-२१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ संध्याकाळ झाल्यावर येशू १२ शिष्यांसोबत आला.+ १८ मग ते मेजाभोवती बसून जेवत असताना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्यासोबत जेवायला बसलेला तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+ १९ हे ऐकून त्यांना फार दुःख झालं आणि एकापाठोपाठ एक प्रत्येक जण त्याला विचारू लागला: “तो मी तर नाही ना?” २० तो त्यांना म्हणाला: “तुम्हा १२ जणांपैकी जो माझ्याबरोबर ताटात हात घालतोय, तोच तो आहे.+ २१ कारण मनुष्याच्या मुलाबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे तो तर जाणारच आहे; पण जो मनुष्याच्या मुलाचा विश्वासघात करून त्याला पकडून देईल त्या माणसाची किती दुर्दशा होईल!+ तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!”+
-