२१ पण पाहा! माझा विश्वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर जेवतोय.+ २२ कारण मनुष्याचा मुलगा तर ठरल्याप्रमाणे जाणारच आहे.+ पण, जो माणूस मनुष्याच्या मुलाचा विश्वासघात करून त्याला पकडून देईल त्याचा धिक्कार असो!”+ २३ हे ऐकून ते एकमेकांना विचारू लागले, की आपल्यापैकी खरंच कोण असं करेल.+