-
मार्क १४:३७-४२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३७ तो परत आला तेव्हा शिष्यांना झोपलेलं पाहून तो पेत्रला म्हणाला: “शिमोन, तू झोपत आहेस? तुला थोडा वेळसुद्धा जागं राहायला जमलं नाही का?+ ३८ तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+ ३९ मग तो पुन्हा गेला आणि त्याने तशीच प्रार्थना केली.+ ४० नंतर त्याने पुन्हा येऊन त्यांना झोपलेलं पाहिलं, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. त्यामुळे काय उत्तर द्यावं हे त्यांना कळत नव्हतं. ४१ मग तो तिसऱ्यांदा शिष्यांकडे परत येऊन त्यांना म्हणाला: “अशा वेळी तुम्ही झोपत आहात आणि विश्रांती घेत आहात! आता पुरे झालं! वेळ आली आहे!+ पाहा! मनुष्याच्या मुलाला विश्वासघाताने पापी लोकांच्या हाती पकडून दिलं जातंय. ४२ उठा, आपण जाऊ या. पाहा! माझा विश्वासघात करणारा जवळ आलाय!”+
-