१७ मग अलीशा प्रार्थना करू लागला आणि म्हणाला: “हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड, म्हणजे याला दिसेल.”+ यहोवाने लगेच त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा अलीशाच्या सभोवती+ असलेल्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशावर त्याला अग्नीचे घोडे आणि अग्नीचे युद्ध-रथ दिसले.+
१० त्याच्यासमोरून आगीचा प्रवाह वाहत होता.+ हजारो स्वर्गदूत त्याची सेवा करत होते, आणि लाखो स्वर्गदूत त्याच्यासमोर उभे होते.+ मग न्यायसभा+ भरली आणि पुस्तकं उघडली गेली.