५३ मग त्यांनी येशूला महायाजकाकडे नेलं.+ तिथे सगळे मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री जमले होते.+५४ पण, पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे चालत महायाजकाच्या अंगणापर्यंत गेला. तिथे तो घराच्या नोकरचाकरांसोबत शेकोटीजवळ बसला.+
५४ मग ते त्याला अटक करून महायाजकाच्या घरी घेऊन गेले.+ पण पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे गेला.+५५ ते अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवून बसले, तेव्हा पेत्रही त्यांच्यामध्ये बसला.+