-
लूक ८:३५-३७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३५ तेव्हा नेमकं काय घडलं हे पाहायला लोक निघाले. ते येशूकडे आले तेव्हा ज्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत निघाले होते, तो त्यांना येशूच्या पायाजवळ बसलेला दिसला. त्याने कपडे घातले होते आणि तो शुद्धीवर होता. हे पाहून लोक घाबरले. ३६ ज्यांनी ही घटना पाहिली होती त्यांनी दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला माणूस कसा बरा झाला हे त्यांना सांगितलं. ३७ तेव्हा, गरसेकरांच्या आसपासच्या प्रदेशातून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी येशूला तिथून निघून जायला सांगितलं, कारण ते फार घाबरले होते. मग, येशू नावेत बसून परत जायला निघाला.
-