३९ येशू म्हणाला: “तो दगड बाजूला करा.” मेलेल्या माणसाची बहीण मार्था त्याला म्हणाली: “प्रभू, आता तर त्याच्या शरीराला दुर्गंधी सुटली असेल, कारण चार दिवस होऊन गेलेत.” ४० येशू तिला म्हणाला: “मी तुला सांगितलं नव्हतं का, की तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरवी सामर्थ्य पाहशील?”+