-
मत्तय ९:२३-२६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ मग येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी आला, तेव्हा त्याने बासरीवर शोकसंगीत वाजवणाऱ्या आणि मोठमोठ्याने रडणाऱ्या लोकांना पाहिलं.+ २४ तो म्हणाला: “तुम्ही सगळे बाहेर जा. कारण मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले. २५ लोकांना बाहेर पाठवल्यावर तो आत गेला आणि त्याने मुलीचा हात आपल्या हातात घेतला.+ तेव्हा ती लगेच उठली.+ २६ या घटनेची बातमी त्या पूर्ण प्रदेशात पसरली.
-
-
लूक ८:५१-५६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५१ येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने पेत्र, योहान, याकोब आणि त्या मुलीच्या आईवडिलांशिवाय कोणालाही आपल्यासोबत आत येऊ दिलं नाही. ५२ बाहेर सगळे लोक तिच्यासाठी रडत होते आणि छाती बडवून शोक करत होते. म्हणून, येशू त्यांना म्हणाला: “रडू नका,+ मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ ५३ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले. कारण ती मेली आहे हे त्यांना माहीत होतं. ५४ पण त्याने तिचा हात धरून, “बाळा, ऊठ!” असं मोठ्याने म्हटलं.+ ५५ तेव्हा, ती पुन्हा जिवंत झाली*+ आणि लगेच उठली.+ मग तिला काहीतरी खायला द्या, असं त्याने त्यांना सांगितलं. ५६ मुलीला जिवंत झाल्याचं पाहून तिच्या आईवडिलांना इतका आनंद झाला, की त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता. पण येशूने त्यांना बजावून सांगितलं की जे काही घडलं होतं, ते त्यांनी कोणालाही सांगू नये.+
-