६१ सर्वोच्च प्रभू यहोवा याची पवित्र शक्ती माझ्यावर आहे.+
दीनदुबळ्यांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी यहोवाने माझा अभिषेक केला आहे.+
दुःखी मनाच्या लोकांची मलमपट्टी करण्यासाठी,
बंदिवानांना सुटका जाहीर करण्यासाठी,
आणि कैद्यांचे डोळे उघडले जातील हे त्यांना सांगण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.+