-
मत्तय ३:७-१०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ बऱ्याच परूशी* आणि सदूकी*+ लोकांना त्या ठिकाणी येताना पाहून तो त्यांना म्हणाला: “अरे विषारी सापाच्या पिल्लांनो!+ देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून तुम्ही वाचू शकता असं तुम्हाला कोणी सांगितलं?+ ८ आधी तुमचा पश्चात्ताप तुमच्या कामांतून दाखवा.* ९ ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ अशा भ्रमात राहू नका.+ कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्न करू शकतो. १० कुऱ्हाड तर केव्हाच झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आली आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून आगीत टाकलं जाईल.+
-