वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १२:९-१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ तिथून निघाल्यावर तो त्यांच्या सभास्थानात गेला. १० तिथे वाळलेल्या* हाताचा एक माणूस होता.+ तेव्हा, येशूवर आरोप लावण्यासाठी काही जणांनी त्याला विचारलं: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याला बरं करणं नियमाप्रमाणे योग्य आहे का?”+ ११ तो त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ जर एक मेंढरू असेल आणि ते शब्बाथाच्या दिवशी खड्ड्यात पडलं, तर तुमच्यापैकी असा कोण आहे जो लगेच त्याला धरून बाहेर काढणार नाही?+ १२ मेंढरापेक्षा माणूस किती जास्त मौल्यवान आहे! तर मग, शब्बाथाच्या दिवशी चांगलं काम करणं नियमाप्रमाणे नक्कीच योग्य आहे.” १३ मग तो त्या माणसाला म्हणाला: “हात लांब कर.” त्याने तो लांब केला, तेव्हा तो त्याच्या दुसऱ्‍या हातासारखा चांगला झाला. १४ पण परूशी लोक बाहेर जाऊन येशूला ठार मारण्याचा कट करू लागले.

  • मार्क ३:१-६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ तो पुन्हा एका सभास्थानात गेला, तेव्हा तिथे वाळलेल्या* हाताचा एक माणूस होता.+ २ येशू त्याला शब्बाथाच्या दिवशी बरं करतो का, हे पाहायला परूशी त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. कारण त्यांना त्याच्यावर आरोप लावायचा होता. ३ येशू त्या वाळलेल्या* हाताच्या माणसाला म्हणाला: “ऊठ, इथे मधे ये.” ४ मग तो त्यांना म्हणाला: “शब्बाथाच्या दिवशी काय करणं योग्य आहे? एखाद्याचं भलं करणं की वाईट करणं? एखाद्याचा जीव वाचवणं की जीव घेणं?”+ पण ते काहीच बोलले नाहीत. ५ त्यांची मनं किती कठोर आहेत+ हे पाहून त्याला खूप दुःख झालं. तेव्हा त्याने रागाने त्यांच्यावर एक नजर टाकली आणि तो त्या माणसाला म्हणाला: “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात बरा झाला. ६ हे पाहून परूशी बाहेर गेले आणि लगेच हेरोदच्या पक्षाच्या लोकांसोबत+ मिळून येशूला ठार मारायचा कट रचू लागले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा