-
मत्तय २३:२७, २८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२७ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्यांनो,+ तुमचा धिक्कार असो! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात.+ त्या बाहेरून तर फार सुंदर दिसतात, पण आत त्या मेलेल्या माणसांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. २८ त्याच प्रकारे तुम्हीही लोकांना बाहेरून नीतिमान दिसता, पण आत तुम्ही ढोंगीपणाने आणि अनीतीने भरलेले आहात.+
-
-
लूक १८:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ ज्यांना स्वतःच्या नीतिमत्त्वावर फार भरवसा होता आणि जे इतरांना अगदीच तुच्छ लेखायचे, त्यांना त्याने हे उदाहरणही सांगितलं:
-