२३ पण याकरता हे आवश्यक आहे, की तुम्ही विश्वासात टिकून राहावं+ आणि इमारतीच्या पायावर स्थापन केलेलं+ आणि स्थिर+ असं राहावं. तसंच, जो आनंदाचा संदेश तुम्ही ऐकला आणि ज्याची घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत करण्यात आली,+ त्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नये. मी पौल, याच आनंदाच्या संदेशाचा सेवक झालो आहे.+