२८ मग मी माझी पवित्र शक्ती सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन,+
आणि तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्यवाण्या करतील,
तुमच्यातली वृद्ध माणसं स्वप्नं पाहतील,
आणि तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.+
२९ त्या दिवसांत मी माझ्या दासांवर आणि दासींवरही
माझी पवित्र शक्ती ओतीन.
३० मी आकाशात आणि पृथ्वीवर अद्भुत गोष्टी दाखवीन,
रक्त, अग्नी आणि धुराचे लोट दिसतील.+
३१ यहोवाचा महान आणि भयानक दिवस येण्याआधी+
सूर्य काळवंडेल आणि चंद्र रक्तासारखा लाल होईल.+
३२ आणि जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल;+
कारण यहोवाने सांगितल्याप्रमाणे, सीनाय पर्वतावर आणि यरुशलेममध्ये वाचलेले लोक,+
म्हणजे ज्यांना यहोवाने बोलावलं आहे, ते वाचलेले लोक असतील.”