४६ आणि तो त्यांना म्हणाला, “शास्त्रात हेच लिहिलंय, की ख्रिस्ताला दुःख सहन करावं लागेल आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यांतून उठेल.+ ४७ आणि यरुशलेमपासून सुरुवात करून+ सगळ्या राष्ट्रांत अशी घोषणा केली जाईल,+ की त्याच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी सगळ्यांनी पश्चात्ताप करावा.+