६ तेव्हा स्त्रीने पाहिलं, की त्या झाडाचं फळ खायला चांगलं आणि दिसायला सुंदर आहे. ते झाड दिसायला खरोखर खूप छान होतं. म्हणून तिने त्याचं फळ तोडलं आणि ते खाल्लं.+ नंतर, तिचा नवरा तिच्यासोबत असताना तिने त्यालाही ते फळ दिलं, आणि त्याने ते खाल्लं.+
१९ तुला जमिनीपासून बनवण्यात आलं आहे.+ त्यामुळे जोपर्यंत तू जमिनीला जाऊन मिळत नाहीस, तोपर्यंत अन्नासाठी घाम गाळत राहशील. तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील.”+